नदीतील गाळ काढा, शेती वाचवा

नदीतील गाळ काढा, शेती वाचवा
Published on

39546

नदीतील गाळ काढा, शेती वाचवा

रेवंडीवासीय ः कालावल-रेवंडीप्रश्‍नी राणेंना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : कालावल-रेवंडी खाडीपात्रातील सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेला वाळूमिश्रित गाळ काढण्यासाठी तातडीने लिलाव प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी रेवंडी येथील ग्रामस्थांनी आमदार नीलेश राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या गाळामुळे पर्यावरणासह स्थानिक शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री पर्वतरांगांमधून वेगाने वाहणारी गडनदी मालडी ते सर्जेकोट भागात ‘कालावल खाडी’ म्हणून ओळखली जाते. डोंगरावरील वृक्षतोडीमुळे दरवर्षी या खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू मिश्रित गाळ वाहून येतो. रेवंडी हे गाव या पात्राच्या शेवटच्या टप्प्यात असल्याने तिथे गाळाचे मोठे साठे जमा झाले आहेत.
ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे अनेक भीषण समस्यांकडे लक्ष वेधले आहे. यात खाडीपात्र उथळ झाल्यामुळे भरतीचे खारे पाणी लगतच्या दुपीकी शेतजमिनीत घुसून जमिनी नापीक होत आहेत. जमिनीखालील पाण्याची पातळी खारट होत असल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. पात्र उथळ झाल्यामुळे खाडीचे काठ फुटून जमिनीची धूप होत आहे. तसेच कांदळवनांचे अतिक्रमण वाढल्याने शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. स्थानिक मच्छीमार आणि नौका नयन मार्गात अडथळे येत असून, भविष्यात ‘उत्तरांचल’ सारखी पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी रेवंडी उपसरपंच श्रद्धा वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखाप्रमुख विराज तळाशीलकर, सदस्य मेघना कांबळी, संतोष कांबळी, प्रिया कांबळी, प्राजक्ता कांबळी, माजी सरपंच युवराज कांबळी, भावेश कांबळी, विकास चेंदवणकर, पांडुरंग कांबळी, सुधीर कांबळी, संजय कांबळी, अनिरुद्ध पोयरेकर, अनील वराडकर, प्रतीक वेंगुर्लेकर, साई वेंगुर्लेकर, प्रमोद कांबळी, बंटी तळाशीलकर, संतोष मुणगेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com