

39603
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सोनुर्ली-जाधववाडीत बुधवारी
डॉ. आंबेडकर जयंती उत्सव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः सोनुर्ली-जाधववाडी येथील नवयुवक कला, क्रीडा मंडळाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती बुधवारी (ता. २९) साजरी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, त्रिसरण पंचशील आणि बुद्ध पूजेने होईल. त्यानंतर ९.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता आयोजित अभिवादन सभेत ‘भारतीय संविधान, आमचा प्राण’ या विषयावर फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सचिव महेंद्र मातोंडकर यांचे प्रमुख व्याख्यान होणार आहे. या सभेला सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यानिमित्त रील स्टार’ स्पर्धेचे आयोजन केले असून ‘काव्य रमाईचे, दिव्य भीमाचे’ या विषयावर आधारित ६० ते ९० सेकंदांच्या व्हिडिओंच्या माध्यमातून ही स्पर्धा होईल. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ३५००, २५०० आणि १५०० रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येईल. दुपारी २ ते ५ या वेळेत आय केअर सावंतवाडी यांच्यावतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, सायंकाळी ५ वाजता भव्य ‘जयभीम रॅली’, ६ वाजता महिलांच्या प्रबोधनासाठी ‘पदर रमाईचा’ हा विशेष कार्यक्रम होईल. विजेत्या महिलांना पैठणी व साड्यांची बक्षिसे दिली जातील. रात्री ८.३० वाजता समूह भीमगीत गायन स्पर्धेने या सोहळ्याची सांगता होईल. या स्पर्धेचे परीक्षण सुनील मयेकर, डॉ. आनंद राथवे करणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याला सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, लक्ष्मीदास ठाकूर, नागेश गावकर आणि सतीश सोनुर्लेकर उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.