

रापण संघाच्या शेडमधील
तांब्याचे दोन हांडे चोरीला
वायरीतील घटना; पोलिसांत फिर्याद
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : वायरी भूतनाथ येथील वाईरकर रापण संघाच्या मच्छीमारी शेडमधून तांब्याचे दोन मोठे हांडे चोरीला गेले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद संघाच्या वतीने तुकाराम झाड यांनी मालवण पोलिसांत दिली. पोलिसांनी याबाबत अनोळखीविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांवर पायबंद बसण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वायरी भूतनाथ समुद्र किनारी पारंपरिक मासेमारी करणाऱ्या वाईरकर रापण संघाची शेडवजा झोपडी आहे. या शेडमध्ये सुमारे ७० ते ७५ हजार किमतीचे तांब्याच्या धातूचे दोन मोठे हांडे ठेवण्यात आले होते. हे दोन्ही हांडे अज्ञात चोरट्यांनी रविवारी (ता. १९) रात्रीच्या वेळी चोरले. याच भागात पर्यटकांचा एक ग्रुप रात्री आपली भांडी घेऊन जेवण बनवत असल्याचे काही मच्छीमारांनी पाहिले होते. चोरीच्या घटनेची माहिती समजताच नागरिकांनी परिसरात या पर्यटकांच्या ग्रुपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते सापडले नाहीत. पोलिसांनी चोरीच्या प्रकरणाचा शोध घेत चोरट्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.