

39612
दोडामार्ग तालुक्यामध्ये
शिवसेना वाढीचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २५ : तालुक्यात शिवसेना वाढीसाठी पूर्ण ताकद लावण्याचा निर्धार पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंच आणि शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी (ता. २४) झाली. या बैठकीत आमदार नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.
आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. याप्रसंगी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने संघटन विस्तारासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला. दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याबाबत या बैठकीत एकमत झाले. निवडणुकीच्या रणनीतीबाबत आमदार राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या दृष्टीने प्रभागांमधील कामांचे नियोजन आणि जनसंपर्क वाढवण्याबाबत आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या. या बैठकीमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्हाप्रमुख संजू परब, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, गोपाळ गवस, जिल्हा परिषद सदस्या सौ. तळवणेकर, तालुकाप्रमुख तथा उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्या सायली निंबाळकर, नेहा गवस, सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.