

-rat२५p१.jpg
26O39617
रत्नागिरी : भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज जिल्हा भाजप कार्यालयात स्वागत करताना विक्रम जैन. सोबत भाई जठार, राहुल पवार, राजू भाटलेकर, शैलेश बेर्डे आदी.
-------------
राज्यात भाजप युवा मोर्चा सक्षम करणार
कृष्णराज महाडिक ः जागर यात्रेचे स्वागत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : युवा मोर्चा जागर यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करून भाजप युवा मोर्चा सक्षम करणार आहे. युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी व युवा व सरकार यांच्यातील दुवा होण्याचे काम युवा मोर्चा करेल. युवकांच्या रोजगाराच्या समस्या आहेत. परंतु युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बनावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले.
श्री. महाडिक आज रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यावेळी भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, मी तुमचा मित्र-सखा असून त्या पद्धतीनेच काम करणार आहे. तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता. युवा मोर्चा जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत आहे. श्री. महाडिक यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात केली. पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक स्मारकास भेट दिली. नंतर भाजप जिल्हा कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भाजप शहर सरचिटणीस नीलेश आखाडे यांनी महाडिक यांची ओळख करून दिली. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी युवा मोर्चा अधिक सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी विक्रम जैन, रत्नागिरी शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, उपाध्यक्ष संतोष सावंत, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.