स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे तबला वादन परीक्षेमध्ये यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे 
तबला वादन परीक्षेमध्ये यश
Published on

39637

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे
तबला वादन परीक्षेमध्ये यश
सावंतवाडी ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय आयोजित तबला परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले. या परीक्षेत प्रशालेतील एकूण ६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रारंभिक (तबला) गटात सहावीमधील गौरंग परब, पाचवीतील आराध्य शेटवे आणि सातवीमधील राज गवस यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली. सहावीमधील अद्वैत पाथरवट व पाचवीतील यज्ञेश पवार यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. तसेच प्रवेशिका प्रथम गटात सहावीमधील भुवन दळवी याने द्वितीय श्रेणी मिळवत यश प्राप्त केले. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेत अभिनंदन करण्यात आले. त्यांना मार्गदर्शन करणारे तबला शिक्षक प्रमोद मुंडये यांचेही विशेष कौतुक केले. शाळेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com