बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त मरगळ झटकणार

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त मरगळ झटकणार
Published on

-rat२५p६.jpg-
26O39645
रत्नागिरी ः उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मयुरेश पाटील. सोबत उपनेते बाळ माने, देसाई आदी.
-----
संवादातून पदाधिकारी नियुक्त्या
मयुरेश पाटील ः ठाकरे सेनेची तालुका कार्यकारिणीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मरगळ झटकत पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाला अधिक बळ देण्याच्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम आखून नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना संबंधित विभागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच नियुक्त्या केल्या जातील, असे तालुकाप्रमुख मयुरेश पाटील यांनी स्पष्ट केले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची रत्नागिरी तालुका कार्यकारिणी बैठक माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात झाली. या बैठकीस उपनेते बाळ माने, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष रहाटे, दीपक सुर्वे, महिला तालुका संघटक ममता जोशी, उप तालुका संघटक समिधा भाटकर, युवा सेना तालुकाप्रमुख युक्ता आंबेकर, पावस विभाग प्रमुख किरण तोडणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनेते बाळ माने यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. दरम्यान, मंदार वारेकर यांची कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. बैठकीत विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com