

-rat२५p११.jpg-
26O39654
देवरूख ः नगराध्यक्षा मृणाल शेटये यांना निवेदन देताना भाजप पदाधिकारी.
---
देवरूखातील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर
भाजपचे निवेदन ; तातडीने काम करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २४ ः देवरूख शहरातील चोरपऱ्या बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला मशीद या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळा तोंडावर आला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि स्वतःच्याच पक्षाचे नगराध्यक्ष असूनही या कामासाठी शहर भाजपला प्रशासनासह नगराध्यक्षांना निवेदन देण्याची वेळ आली आहे.
शहरातील चोरपऱ्या-बाजारपेठ ते मुस्लिम मोहल्ला रस्ता सध्या पूर्णपणे उखडला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी सुमारे ६५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शासनाच्या नागरी सेवा सुविधा योजनेतून नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन होणार होते. मात्र, नियोजित तारखेला भूमिपूजन झाले नाही आणि कामालाही सुरुवात झाली नाही.
पावसाळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असतानाही कामात होत असलेल्या विलंबामुळे शहर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने दिलेल्या निवेदनात रस्त्याच्या कामातील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात.पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल सार्थ ठरविण्यासाठी विकासकामांना गती द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनानंतर मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी भाजप शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.