देवरूखात प्रभातफेरीतून जनजागृती

देवरूखात प्रभातफेरीतून जनजागृती
Published on

-rat२५p७.jpg-
26O39646
देवरूख ः वाशीतर्फे देवरूखमध्ये प्रभातफेरीतून जनजागृती करताना विद्यार्थी, ग्रामस्थ.
------------
हिवतापमुक्तीसाठी प्रभातफेरीतून जागृती
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २५ ः जागतिक हिवताप दिनानिमित्त (ता. २५) देवरूख परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. वाशीतर्फे देवरुख येथील ग्रामस्थ आणि आरोग्य विभागाच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे कीटकजन्य आजारांपासून संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
हिवताप आणि डेंगी सारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर याप्रसंगी भर देण्यात आला. डासांची अंडी, अळी आणि कोश या अवस्था पाण्यातच नष्ट केल्यास डासांचा प्रादुर्भाव रोखता येतो. यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, साठवलेली भांडी घासून पुसून भरणे, पाणीसाठ्यांवर झाकण ठेवणे आणि गप्पी मासे सोडणे यांसारख्या उपाययोजनांचे महत्त्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी पटवून दिले.
हिवतापाच्या लक्षणांमध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम सुटणे आणि तीव्र डोकेदुखी यांचा समावेश होतो. विशेषतः ‘प्लाज्मोडियम फॅलसीपॅरम’ या जंतूमुळे होणारा हिवताप जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे ताप सदृश लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रभातफेरीत वाशीचे सुनील सावंत, बाळकृष्ण करंडे, रमेश जोरत, भाई कडू, पांडुरंग पवार, महेश सावंत, आरोग्य सेवक विजय राऊत, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशा सेविका आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. गावागावात जाऊन घोषणाबाजी आणि माहिती पत्रकांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com