

rat26p8.jpg-
39730
राजापूर ः आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करताना राहुल राणे, प्रसाद मोहरकर, डॉ. राजाराम राठोड आणि मान्यवर.
पदवी हा संघर्षाच्या कहाणीचा सुवर्ण अध्याय
राहुल राणे ; मराठे महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः “आजचा सुवर्णक्षण म्हणजे ज्ञानाच्या अखंड साधनेला लाभलेला तेजस्वी मुकुटमणी आहे. हा दिवस केवळ पदवी प्राप्तीचा नसून अथक परिश्रम, जिद्द आणि स्वप्नांच्या अथांग आकाशाला स्पर्श करणाऱ्या ध्येयाचा उत्सव आहे. पदवी म्हणजे केवळ कागद नसून ती व्यक्तीमत्त्वाच्या परिपक्वतेची साक्ष आणि स्वप्नांना क्षितिजाकडे नेणारा प्रकाशस्तंभ आहे,” असे प्रेरक प्रतिपादन अॅड. राहुल राणे यांनी केले.
तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचा वार्षिक पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रसाद मोहरकर, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रसाद मोहरकर यांनी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर प्राचार्य डॉ. राठोड म्हणाले, "हा सोहळा तुमच्या तीन वर्षांच्या मेहनतीचा गौरव असून एका नव्या प्रवासाची ही सुरुवात आहे. या पदवीमुळे तुमच्या भविष्याला निश्चितच नवी दिशा मिळेल."
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक शैलेंद्र प्रभुदेसाई यांना पुणे येथील आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे ''महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६'' पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय परीक्षा विभाग प्रमुख प्रा. सतीशकुमार कांबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शैलेंद्र प्रभुदेसाई यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पंकज कांबळे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.