

वाशिष्ठी प्रकल्पामुळे
हजारो लिटर दुधाचे संकलन
कृष्णराज महाडिकः स्थानिक तरुणांना रोजगार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः पश्चिम महाराष्ट्र हा सहकारातील ऊस आणि दूध उत्पादनामुळे विकसित झाला आहे. मात्र, कोकणात वाशिष्ठी सारखा प्रकल्प उभारणे मोठे आव्हान होते. आज हजारो शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले असून, दररोज हजारो लिटर दुधाचे संकलन येथे होत आहे. ७४ हून अधिक दर्जेदार उत्पादने या माध्यमातून बाजारपेठेत उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना मोठा रोजगार मिळाला असून, शेतकऱ्यांना शेतीपूरक असा हक्काचा व्यवसाय उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले.
श्री. महाडिक यांनी ‘वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट’ या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते वैभव खेडेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या संचालिका सीमाताई चव्हाण, वैभव चव्हाण, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, नयना पवार आदी उपस्थित होते.
महाडिक म्हणाले, ‘‘वाशिष्ठी प्रकल्पाचे नाव मी ऐकून होतो. कोकणात असा आधुनिक प्रकल्प उभा करणे आणि तो यशस्वी करणे, हे धाडस फक्त प्रशांत यादव आणि त्यांचे कुटुंबीयच करू शकतात. हा केवळ एक व्यावसायिक प्रकल्प नसून, तो शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे. कोकणची भौगोलिक परिस्थिती आणि शेतीची पद्धत इतर विभागांच्या तुलनेत वेगळी आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत प्रशांत यादव यांनी दाखवलेले धाडस अतुलनीय असून, त्यांनी उभा केलेला ''वाशिष्ठी'' दूध प्रकल्प संपूर्ण कोकणात धवल क्रांती घडवेल."
भाजप युवा मोर्चाची ''युवाशक्ती जागर यात्रा'' सध्या कोकण दौऱ्यावर आहे. रायगड, खेड आणि गुहागरमार्गे ही यात्रा चिपळूणमध्ये दाखल झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.