

rat26p4.jpg-
39729
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना डॉ. श्रीरंग कद्रेकर. सोबत दिवाकर लिमये, डॉ. दिलीप नागवेकर, एल. एस. जोशी, श्रीराम भावे, डॉ. चंद्रशेखर केळकर.
पटवर्धन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी संघाचा स्तुत्य उपक्रम
डॉ. श्रीरंग कद्रेकर; १२५ व्या वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम होणार
रत्नागिरी, ता. २६ : शासनाच्या आदेशानुसार शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, याद्वारे शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांनी योगदान द्यावे, असे आवाहन भारत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी केले.
पटवर्धन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी संघामार्फत आयोजित पहिल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी, तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, डॉ. चंद्रशेखर केळकर, विनायक हातखंबकर, हरी करमरकर, दिवाकर लिमये, राजेंद्र कांबळे, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, शीतल काळे, नित्यानंद भुते, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, संस्थेचे कार्यवाह तथा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धनेश रायकर, कोषाध्यक्ष गौरांग आगाशे उपस्थित होते. यावेळी श्रीराम भावे म्हणाले, गेल्या काही वर्षांत नवीन इमारती बांधण्यात आल्या असून सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर आहे. आधुनिक युगाला आवश्यक विद्यार्थी घडवण्याचे काम शाळा करत आहे. माजी विद्यार्थी संघाच्या सर्व सदस्यांनी शाळेला सहकार्य करावे.
तसेच याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष धनेश रायकर म्हणाले, माजी विद्यार्थ्यांशी संपर्क होण्यासाठी चॅटबॉट सुविधा सुरू केली आहे. याद्वारे हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. पटवर्धन हायस्कूलचे १२५ वे वर्ष लवकरच सुरू होणार असून माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.