पुस्तक वाचनातून उलगडतायत नवे विचारविश्व

पुस्तक वाचनातून उलगडतायत नवे विचारविश्व
Published on

39737

पुस्तक वाचनातून उलगडतायत नवे विचारविश्व

आजगावातील उपक्रम; ‘नाटक’ साहित्य प्रकारात लोणे प्रथम


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ : आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे जानेवारीपासून सुप्रसिद्ध साहित्यिक कै.कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम राबवला जात आहे. सहभागी चौदा वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परिक्षण लिहीत आहेत. मार्चमधील ‘नाटक’ या साहित्य प्रकारात शिरोड्यातील सायली लोणे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर वैभवी रायशिरोडकर यांना द्वितीय आणि प्रियदर्शनी म्हाडगुत व सोमा गावडे यांना तृतीय क्रमांक मिळाला. सायली लोणे यांनी वीणा गवाणकर यांच्या ‘शाश्वती’ या नाट्यसंहितेचे परीक्षण केले होते.
या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी विजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’, सरोज रेडकर यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’, अरुण धर्णे यांनी प्र. के. अत्रे यांच्या ‘पाणिग्रहण’, नीलम कांबळे यांनी गिरीश कर्नाड यांच्या ‘तलेदंड’, स्नेहा नारींगणेकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या ‘भाग्यवान’, राजेश वैज यांनी ज.तु.गार्डे यांच्या ‘घर असतं दोघांचं’, जयदीप देशपांडे यांनी पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘कट्यार काळजात घुसली’, सोमा गावडे यांनी डॉ. अनिल सरमळकर यांच्या ‘मी अश्वत्थामा’, वैभवी रायशिरोडकर यांनी जयवंत दळवी यांच्या ‘नातीगोती’, शेखर पणशीकर यानी संदिप मणेरीकर यांच्या ‘सं. सूरसम्राट’, अर्चना लोखंडे यांनी पु. ल. देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी’, विशाखा वेंगुर्लेकर यांनी गंगाराम गवाणकर यांच्या ‘सं. विठ्ठल विठ्ठल’ आणि विनय सौदागर यांनी अजित दळवी यांच्या ‘गांधी विरुद्ध गांधी’ अशा चौदा नाटकांचे परीक्षण केले. कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी दाभोली हायस्कूलचे निवृत्त माध्यमिक शिक्षक लक्ष्मण साळगावकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात साळगावकर यांनी स्पर्धकांच्या जाणवलेल्या त्रुटी व घ्यावयाची काळजी याविषयी मुद्देसूद मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या संयोजनाचे काम विनय सौदागर यांनी पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com