अधिकारीपदाची बीजे शाळेतूनच

अधिकारीपदाची बीजे शाळेतूनच
Published on

39738

अधिकारीपदाची बीजे शाळेतूनच

विक्रांत सावंत; शिष्यवृत्ती सराव परीक्षेला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम आहे. अनेक कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी जिल्ह्यात असूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग व तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये कमी पडतात. शालेयस्तरापासून त्यांची तयारी व्हावी, यासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन महत्त्वाचे आहे. यातूनच पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अधिकारी निर्माण होतील, असा आशावाद जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे युवा अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला आहे.

श्री. सावंत यांच्या माध्यमातून सावंतवाडी, दोडामार्ग, माजगाव केंद्रासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा झाली. आपल्या जिल्ह्यातून अधिकाधिक विद्यार्थी अधिकारी व्हावेत, यासाठी त्यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण हेच विकासाचे मुख्य सूत्र या ध्येयातून विक्रांत सावंत यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्याच संकल्पनेतून सावंतवाडी, दोडामार्ग व माजगाव या तीन केंद्रांवर शिष्यवृत्ती सराव परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी विक्रांत सावंत यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढविला. गुणवंत विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तूंनी सन्मान करण्यात आला. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक एस. एन. पाटील, मुख्याध्यापिका एस. एस. कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक एन. जी. मुठे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीतर्फे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com