

39805
39806
स्व-गणना एक मेपासून
तहसीलदार पाटील ः ऑनलाईन माहिती भरता येणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ : भारत सरकारतर्फे घरसूची आणि गृहगणना लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी १५ दिवसांची एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये स्वतः आपली माहिती ऑनलाईन भरू शकता. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ ते १४ मे दरम्यान स्व-गणना होणार आहे, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
स्व गणना करता येणार असून यानंतर १५ मे ते १५ जून आमच्या प्रगणकांच्या माध्यमातून प्रत्येक घरात भेटी देऊन माहिती गोळा करणार आहेत. मात्र, स्व जनगणनेचा पर्याय उपलब्ध असून त्याचा फायदा नागरिकांनी करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. तुमची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाणार असून आमची जनगणना, आमचा विकास असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले आहे.
००००००००
कोट
39740
अधिकृत पोर्टलवर जाऊन प्रत्येकाला नोंदणी करता येणार आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे लॉग-इन करता येईल. सर्व पक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ११ अंकी एसई आयडी प्राप्त होईल. हा एसई आयडी जपून ठेवाण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा.
- श्रीधर पाटील, तहसीलदार, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.