

39741
सजगता हीच ग्राहकांची सुरक्षितता
अरुण वाघमारे ः कुडाळात प्रबोधन कार्यशाळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः बऱ्याचदा ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम विक्रेते, सेवा देणाऱ्या संस्था तसेच प्रशासन करते. ग्राहकाला आपले हक्क आणि कर्तव्ये माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कार्यशाळा उपयोगी ठरतात. त्यामुळे ग्राहक सजग होतो, असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि कुडाळ तालुका शाखा यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय एकदिवसीय ‘ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा २०२६’चे आयोजन येथील मराठा समाज सभागृहात केले होते. उद्घाटन सत्रावेळी श्री. वाघमारे बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे संघटक सर्जेराव जाधव, कोषाध्यक्षा सुनीता राजेघाटगे, राज्य सहसचिव प्रा. एस. एन. पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) योगेंद्र वाघ, जिल्हा संघटक विष्णुप्रसाद दळवी, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रदीप शिंदे, सचिव प्रा. अजित कानशिडे उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात ‘शेतकरी ग्राहक प्रबोधन’ या अंतर्गत सर्जेराव जाधव, प्रा. एस. एन. पाटील, वफा खान, श्रद्धा कदम, सुनीता राजेघाटगे, धनश्री परब यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत प्रा. एस. एन. पाटील, प्रदीप शिंदे, विष्णुप्रसाद दळवी आणि जिल्हा उपाध्यक्षा सुगंधा देवरुखकर यांनी केले. प्रा. अजित कानशिडे यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्धी प्रमुख नीलेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप शिंदे यांनी आभार मानले.
...................
ग्राहकाने सावधगिरी बाळगावी
श्री. सहारे यांनी, नकली वस्तू, फसवणूक यापासून ग्राहकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. ग्राहकाने आपले अधिकार जपले पाहिजेत, असे आवाहन केले. ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे काम महावितरण करत आहे. ग्राहक आणि महावितरण यांनी सकारात्मक वातावरण तयार करणे आवश्यक असल्याचे मत योगेंद्र वाघ यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.