परुळे भरणीवाडी तीन मे रोजी वर्धापनदिन

परुळे भरणीवाडी तीन मे रोजी वर्धापनदिन
Published on

39742
भरणी श्री देवी सातेरी

परुळे भरणीवाडी तीन मे रोजी वर्धापनदिन
कुडाळ : परुळे भरणीवाडी (ता.वेंगुर्ले) येथील श्री देवी सातेरीचा नववा वर्धापन दिन सोहळा ३ व ४ मे रोजी श्री देवी सातेरी मंदिर भरणी येथे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. ३ मे सकाळी ७ ते ८ वाजता मंगलवाद्य पूजा व अभिषेक सायंकाळी ७ वाजता चिमणी पाखरं डान्स अकादमी, कुडाळ आयोजित जलवा पुरस्कृत : श्री देवी सातेरी नवतरुण कला क्रीडा मंडळ भरणी, रात्री ९ वाजता डबलवारीचा जंगी सामना ओम चैतन्य प्रासादिक भजन मंडळ, उंबडे-वैभववाडी. बुवा - श्रीकांत शिरसाट व हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे-कुडाळ बुवा विजय (गुंडू) सावंत यांच्यात होणार आहे. ४ मे रोजी सकाळी ७ ते ८ वाजता मंगलवाद्य, सकाळी ८ ते ९ वाजता पूजा व अभिषेक, सकाळी ९ ते ११ वाजता श्री सत्यनारायण, दुपारी महापुजा, महाआरती व तिर्थप्रसाद, महाप्रसाद, २.३० वाजता हळदीकुंकू, ३ वाजता हृदयनाथ गावडे यांचे किर्तन, सायंकाळी ५ वाजता भजन श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ, आंबेरी, सायंकाळी ७.३० वाजता स्वर संध्या राम कृष्ण हरी संगीत कार्यक्रम, रात्री १० वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा नाट्यप्रयोग ‘पुष्कर्णी तीर्थ’, असे कार्यक्रम दोन दिवस होणार असून भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान, भरणी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com