

कराटे परीक्षांमध्ये वेंगुर्लेतील मुलांचे यश
वेंगुर्ले : कराटे परीक्षांमध्ये वेंगुर्ला येथील हळदणकर कराटे ब्रांचच्या कराटेपटूंनी घवघवीत यश प्राप्त केले. यशस्वी कराटेपटूंना प्रमाणपत्र व कलर बेल्ट वितरित करण्याचा कार्यक्रम वेंगुर्ला हायस्कूलमध्ये झाला. नॉन व्हाईट फास्टमध्ये मयुरेश तांबोसकर, सुयोग समुद्रे, मृण्मय लिंगोजी, चैतन्य तुळसकर, काजल नरसुले, सृष्टी वाघमारे, ऑरेंज बेल्टमध्ये चेतन पाटील, शुभ्रा राऊळ, प्रेरणा आरोंदेकर, लक्षिता चौधरी, अथर्व गावडे, सुजय परब, रेड बेल्टमध्ये सुयोग समुद्रे, चैतन्य तुळसकर, तेजश्री लांजेकर, विरश्री भिसे, सृष्टी वाघमारे, मृण्मय लिंगोजी, ग्रीन बेल्टमध्ये सार्थक भाटकर, ब्ल्यू बेल्टमध्ये भूमी परुळेकर, यलो बेल्टमध्ये विहान चौधरी, चैतन्य तुळसकर, पर्पल बेल्टमध्ये मयंक नंदगडकर, स्वदीप उकिडवे आणि ब्राऊन बेल्टमध्ये जान्हवी मडकईकर यांनी यश संपादन केले. या सर्वांना सिंधुदुर्ग बायकर क्लबचे लीडर दुर्गेश शेटये, प्रमुख पाहुणे डॉ. सचिन परुळेकर, पालक सोनल राऊळ, वृषाली भिसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व कराटे बेल्ट वितरित करण्यात आले.
-----------
वेंगुर्लेत सामूहिक कुंकुमार्चन सोहळा
वेंगुर्ले : श्री देवी सातेरी मंदिरात सुरू शतचंडी महायाग अनुष्ठानप्रसंगी आयोजित सामूहिक कुंकुमार्चनला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी उपस्थित राहून कुंकुमार्चन केले. वेंगुर्ला गावची ग्रामदेवी श्री देवी सातेरीच्या मळलेपन विधी पार पडल्यानंतर मंदिरात गुरुवारपासून शतचंडी महायाग अनुष्ठान करण्यात आले. या अनुष्ठानप्रसंगी देवता स्थापना, आवाहन, सप्तशती पाठवाचन यासोबतच शुक्रवारी महिलांसाठी सामूहिक कुंकुमार्चन आयोजित केले होते. बहुसंख्य महिला भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहत कुंकुमार्चन सेवा केली. शनिवारी या शतचंडी महायाग अनुष्ठानाची पूर्णाहुती होणार आहे. तर रविवारी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, बारापाच देवतांना नैवेद्य, महाआरती, त्यानंतर महाप्रसाद तसेच रात्री १० वा. सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कसाई-दोडामार्ग यांचे नाटक होणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
---------
कुडाळात १७ मे रोजी धम्म परिषद
दोडामार्ग : येथे बौद्ध धम्म परिषदेनिमित्त नुकताच कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. १७ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कुडाळ येथील वासुदेवानंद हॉल येथे धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला दोडामार्ग तालुक्यातून जास्तीत जास्त लोकांना आणून परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासारडेकर, सरचिटणीस संजय पेंडूरकर, उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर यांनी केले. दोडामार्ग येथील संवाद मेळावा नियोजन बैठकीला सचिव संजय कांबळे, केंद्रीय शिक्षक एस. के. कदम, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, अर्जुन कदम, श्रीधर जाधव, संतोष जाधव, मधुकर कदम, निधी कदम, निलेश कदम, विनोद कदम, राजन जाधव, संदेश जाधव, सचिन जाधव, राहुल जाधव आदी उपस्थित होते.
----------
बिळवस येथे कलश वर्धापन दिन
मसुरे : मसुरे गावची मूळमाया, आदिदेवता आणि आदिशक्ती श्री देवी सातेरी जलमंदिर, बिळवस या मंदिराचा कलश वर्धापन दिन सोहळा ७ मे रोजी आयोजित केला आहे. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ८ ते ९ या वेळेत गणेशपूजन व पुरोहितांच्या मंत्रघोषात कलशपूजन, ९ ते ११ वा. विविध धार्मिक विधी, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ५ वा. श्री सत्यनारायण महापूजा, ५ ते ७ वा. महाआरती, प्रार्थना आणि तीर्थप्रसाद, सायं. ७ ते रात्री १० वा. स्थानिक ग्रामस्थांची भजने, १० वा. श्री ओमकार नटेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कालेली-कुडाळ यांचा भव्य दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. उपस्थितीचे आवाहन बिळवस ग्रामस्थ आणि श्री देवी सातेरी देवालय ट्रस्ट, बिळवस यांच्यावतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.