जिंदल यांची आकाशवाणीवर आज मुलाखत

जिंदल यांची आकाशवाणीवर आज मुलाखत
Published on

जिंदल यांची आकाशवाणीवर आज मुलाखत
रत्नागिरी ः आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची विशेष मुलाखत रत्नागिरी आकाशवाणीवरून सोमवारी (ता. २७) प्रसारित केली जाणार आहे. आकाशवाणीच्या ‘इंद्रधनुष्य’ या लोकप्रिय कार्यक्रमांतर्गत हे सत्र आयोजित केले आहे. विशेष मुलाखतीमध्ये जिंदल हे ‘जनगणना’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतील. जनगणनेची प्रक्रिया, तिचे राष्ट्रीय महत्त्व आणि नागरिकांची जबाबदारी यावर ते प्रकाश टाकणार आहेत. हा कार्यक्रम उद्या होणार सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे. जनगणनेचे महत्त्व आणि त्यातील प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी हा कार्यक्रम ऐकावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे केले आहे.
--------
rat26p11.jpg-
39819
अंकलखोपः नारी शक्ती पुरस्कार स्विकारताना भारती राजवाडे. सोबत ममताताई सिंधुताई सपकाळ, भारती सुनील कोळी, रत्नप्रभा दबडे, समीक्षा पाटील, अश्विनी साळुंखे आणि राजेश्वरी सावंत, शितल चौगुले आदी.

भारती राजवाडे यांना नारी शक्ती पुरस्कार
देवरूखः सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी, राजेश चौगुले फाउंडेशन अंकलखोप (ता. पलूस, जि. सांगली) यांच्यातर्फे देवरुख येथील भारती जयंत राजवाडे यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण अंकलखोप बसवेश्वर चौक येथे झाले. राजवाडे यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. सौ. राजवाडे यांना मानाची शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला बालसंगोपन शिक्षण संस्थेच्या प्रकल्प संचालक ममताताई सिंधुताई सपकाळ, गटशिक्षण अधिकारी भारती सुनील कोळी, विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे, समीक्षा लक्ष्मण पाटील, अश्विनी अमोल साळुंखे आणि श्रीमती राजेश्वरी शशिकांत सावंत, सौ. शितल राजेश चौगुले होत्या.
---------

दिवा पॅसेंजर दादरला नेण्यासाठी हालचाली
रत्नागिरी : रत्नागिरी - दिवा पॅसेंजर दादर येथे नेण्यात यावी, या मागणीसाठी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून त्यांना या संदर्भातील निवेदन दिले होते. या निवेदनावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅसेंजर दिवा येथून दादरला नेण्यासाठीच्या शक्यता तपासून त्यावर कार्यवाही करण्याचे लेखी कळवले आहे. त्यामुळे दिवा येथून पॅसेंजर पूर्ववत दादरला नेण्यासाठीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या विषयात लक्ष घातल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांनी पुढाकार घेऊन रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेची प्रमुख रेल्वे स्टेशन्सचा चेहरामोहरा बदलून टाकला होता. यामुळे या विषयात सुद्धा रवींद्र चव्हाण प्रवाशांना न्याय मिळवून देतील अशी शक्यता काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com