वाहतुकीस अडथळा प्रकरणी चालकावर कारवाई

वाहतुकीस अडथळा प्रकरणी चालकावर कारवाई
Published on

वाहतुकीस अडथळा प्रकरणी चालकावर कारवाई
रत्नागिरी ः शहरातील धनजीनाका येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने कार उभी करणाऱ्या चालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २५) दुपारी पावणे बाराच्या सुमारास करण्यात आली. मुबश्शीर अलीम उद्दीम काझी (२८,रा . साठवली लांजा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल प्रतिक चंद्रकांत कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,शनिवारी दुपारी संशयिताने आपल्या ताब्यातील कार ही तांबट आळी ते धनजी नाका जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीन उभी केली होती,म्हणून कारवाई करण्यात आली.
------------------------------------
मांडवीत दारू प्रकरणी दोघांविरोधी गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील मांडवी येथील हॉटेलच्या बाजूस दारू पिणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवार २५ एप्रिल रोजी रात्री ८.१० ते ८.३० वा.सुमारास करण्यात आली. दिलीप अनिल पवार (२२,रा.झाडगाव,रत्नागिरी) आणि दिनेश रमेश राठोड (२५, रा.मुरुगवाडा झोपडपट्टी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल बालाजी धूमाळ आणि महिला पोलिस नाईक रेखा दिवे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री हे दोन्ही संशयित मांडवी येथील हॉटेलच्या बाजुला असलेल्या दगडांच्या आडोशाला मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com