

39879
स्मृती परब
39880
योगेश आयकर
39881
आस्था बागवे
39882
चिन्मयी पारकर
39883.
कृष्णा मेस्त्री
कांदळगाव शाळेचे विद्यार्थी
‘डॉट कॉम’ परीक्षेत चमकले
मालवण : जिल्हास्तरावर डीसीए (डॉट कॉम असोसिएशन) या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित, ओझर विद्या मंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. सहावीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शाळेतील स्मृती परब हिने २०० पैकी १५६ गुण मिळवून जिल्ह्यात पाचव्या स्थानी येण्याचा मान व सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे २०० पैकी १२८ गुण मिळवून योगेश आयकर व आस्था बागवे (सहावी) यांनी जिल्ह्यात संयुक्त अठरावा क्रमांकासह रौप्यपदक पटकावले. सातवीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये चिन्मयी पारकर व कृष्णा मेस्त्री यांनी कांस्यपदक मिळविले. मुलांच्या या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती, मुख्याध्यापक, ओझर विद्या मंदिर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माता-पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, सर्व पालक व ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
--------
39884
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भंडारी हायस्कूलचे यश
मालवण : विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, यांच्यामार्फत घेतलेल्या जिल्हास्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा विद्यार्थी नागेंद्र तारी याने २४४ गुण मिळवत गुणवत्ता यादीत ३५ वा क्रमांक तर रेणुका चव्हाण हिने २३६ गुण मिळवत ४९ वा क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना पी. जी. मेस्त्री, ए. ए. वाईरकर, एस. पी. बांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.