वासंतिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

वासंतिक वर्गांना
उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

वासंतिक वर्गांना
उत्स्फूर्त प्रतिसाद
ओटवणे ः सावंतवाडी तालुका संस्कृत भारती समिती आणि सावंतवाडी वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेच्या संयुक्त विद्यमाने मळगाव, ओटवणे, सावंतवाडी येथे आयोजित पाच दिवसीय वासंतिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मळगाव इंग्लिश स्कूल, ओटवणे येथे रवळनाथ माध्यमिक विद्यालय, सावंतवाडीत कळसुलकर इंग्लिश स्कूल या तीन ठिकाणी या वासंतिक वर्गाचे आयोजन केले होते. पाच दिवस सकाळी रोज दीड तास चालणाऱ्या या वर्गात सावंतवाडी तालुका संस्कृत भारती समिती आणि सावंतवाडी वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मळगाव येथे सौ वेदांगी जोशी यांनी, ओटवणे येथे मनोहर मयेकर, कृष्णा देवळी, सुनील मेस्त्री, सावंतवाडी येथे दुहिता साखळकर-देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना संस्कृतविषयी अतिशय उपयुक्त स्तोत्रे व सुभाषिते याबाबत मार्गदर्शन केले.
----------------
सातार्डा येथे
विविध कार्यक्रम
सातार्डा ः सातार्डा येथील श्री महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा ३० एप्रिल व १ मे रोजी होत आहे. यानिमित्त ३० एप्रिलला दुपारी दाभोळी येथील मठाधिपती श्री दत्तानंद स्वामी यांच्या हस्ते शिखर कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. सायंकाळी सातला डोंगरपाल येथील श्री स्वामी माऊली दशावतार मंडळाचा ‘महिमा शक्तीपिठाचा, पावागडाच्या कालिचा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. १ मे रोजी सकाळी श्री गणपती, लक्ष्मी माता, सांडये पुरुष देवतांच्या नूतन मूर्तीची स्थापना, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री १० वाजता आरोलकर दशावतार मंडळाचा ‘पुष्कर्णी तीर्थ’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
---------
मळेवाडला शुक्रवारी
रांगोळी स्पर्धा, प्रदर्शन
सावंतवाडी ः श्री कुलदेवता युवक कला, क्रीडा मंडळ मळेवाडच्यावतीने शुक्रवारी (ता. १) सकाळी ११ वाजता श्री कुलदेवता मंदिर, मळेवाड-देऊळवाडी येथे धार्मिक कार्यक्रमांसह श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्त सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम ५ हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ प्रथम एक हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय एक हजार व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळी ६.३० वाजता अमृतनाथ दशावतारी नाट्यमंडळ, म्हापण-वेंगुर्ले प्रस्तुत ‘पंढरीचा पहिला वारकरी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री कुलदेवता युवक कला, क्रीडा मंडळ मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.
..................
सातार्डा येथे उद्या
दशावतार नाटक
सातार्डा ः येथील श्री रवळनाथ पंचायतन देवस्थान वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता.२९) रवळनाथ रंगमंच येथे सायंकाळी सातला चेंदवणकर गोरे दशावतार मंडळाचा ‘क्षण मुखासुर रुक्मिणी संहार’ नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
----------
भैरी भवानी देवीचा
१९ मे रोजी गोंधळ
बागायत ः गोळवण येथील श्री भैरी भवानी देवीचा द्विवार्षिक गोंधळ १९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी या गोंधळ कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री भैरीभवानी देवालय ट्रस्ट- गोळवण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com