

rat२७p८.jpg
26O39943
साखरपा : सकल हिंदू संमेलनात विचार मांडताना संतोष जोशी.
संतांनी हिंदू संस्कृती टिकवली
संतोष जोशी; देवळे येथे सकल हिंदू संमेलन
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता २७ : ‘संत आणि योद्धे यांनी सर्वस्व अर्पण करून हिंदू संस्कृती टिकवली आहे,’ असे प्रतिपादन संतोष जोशी यांनी केले
हिंदू जनजागृती आणि संघटन यासाठी देवळे मंडलअंतर्गत येणाऱ्या आठ गावांच्या सकल हिंदू संमेलनात ते बोलत होते. देवळे येथील श्री खडगेश्वर मंदिरात हे संमेलन पार पडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अमित पंडित यांनी सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू धर्मावर प्रारंभी झालेली मुघल आक्रमणे आणि नंतर झालेली ख्रिश्चन आक्रमणे यांची माहिती दिली. हिंदू धर्म हा धर्मद्वेष मानत नाही तर केवळ कर्तृत्वश्रेष्ठता आणि राष्ट्रभक्ती जाणतो, असे ते म्हणाले.
हिंदू धर्माला असलेल्या सीमेपलीकडील आणि सीमांतर्गत धोक्यांची जाणीव त्यांनी करून दिली. प्रमुख वक्ते संतोष जोशी यांनी हिंदू धर्मासमोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. हिंदू हा केवळ एक धर्म नाही तर ती जीवन जगण्याची पद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. जयश्री जोग यांनी कुटुंबव्यवस्थेवर भर दिला. परकियांच्या आक्रमणांमुळे आपली कुटुंबव्यवस्था धोक्यात आल्याचे त्या म्हणाल्या. कुटुंबातला संवाद संपल्यामुळे ही व्यवस्था धोक्यात आल्याचे सांगून संवादाची गरज त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी संयोजक दिलीप शिर्के यांनी जातीपातींच्या राजकारणावर टीका केली. जातीपातींच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. संमेलनाचे आयोजन प्रशांत शिंदे याने केले तर राजेंद्र मावळणकर यांनी सूत्रसंचालन केले. घाटीवळे, चोरवणे, करंजारी, देवळे, चाफवली, मेघी, कनकाडी, दाभोळे गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.