

rat२७p१३.jpg-
26O39954
पावस - परीक्षेमध्ये यशस्वी झालेले पावस प्रशालेचे विद्यार्थी.
पावस प्रशालेचे ५५ विद्यार्थी
एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण
पावस, ता. २७ ः नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप (NMMS) अर्थात राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. या परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत प्रशालेच्या तब्बल १९ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून ‘पावस पॅटर्न’चा दबदबा सिद्ध केला आहे.
यावर्षी परीक्षेसाठी शाळेचे ६० विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १९ जणांनी गुणवत्ता यादीत झेप घेतली आहे. चैतन्य गुळेकर, जाई पांचाळ, स्वरा आंब्रे, समृद्धी पाटील, प्राची सारंग, स्वराज घवाळी, वेदांगी कुरतडकर, आराध्या बने, स्मित आग्रे, सर्वेश आग्रे, हुवेदा शेख, सर्वेश पत्याणे, आर्या गुरव, कथा जाधव, सोहम बोल्ये, आज्ञा शिंदे, वेदिका शिंदे आणि रोहन डोंगरे या गुणवंतांनी यशाचे शिखर सर केले. या विद्यार्थ्यांना सचिन कडवेकर, उमा लेंडवे, आस्था घवाळी, सोनाली वाघमारे, कात्रे, सौरभ चव्हाण, सुदाम चौरे, हरिश सामंत आणि अरविंद वाघचवरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.