रत्नागिरी- गोसंवर्धनासाठी केंद्र सरकारकडे कायद्याची मागणी

रत्नागिरी- गोसंवर्धनासाठी केंद्र सरकारकडे कायद्याची मागणी
Published on

rat27p11.jpg-
39951
रत्नागिरी : लक्ष्मीचौक येथून सोमवारी गोसंवर्धनासाठी निघालेली गोसन्मान पदयात्रा. यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
--------------
गोमातेच्या संवर्धनासाठी कायदा करा
रत्नागिरीत गोसन्मान पदयात्रा; तहसीलदारांना निवेदन
रत्नागिरी, ता. २७ : गोमातेच्या संवर्धनासाठी व सन्मानासाठी आज रत्नागिरीत पतितपावन मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गोसन्मान पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पायी निघालेली पदयात्रा तहसील कार्यालयात पोहोचली व निवेदन दिल्यानंतर सांगता झाली.
रत्नागिरी पतितपावन मंदिर येथून सकाळी गोवत्स जगदीशानंद महाराज, गणेश गायकवाड, विशाल पटेल, राजेश आयरे, प्रवीण जोशी, परशुराम कदम, संध्या कोसुंबकर आदींच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरवात झाली. देशभरातील गोभक्त, संत समाज व जागरूक नागरिकांच्यावतीने ‘गोसन्मान अभियान’ अंतर्गत पंतप्रधानांना निवेदन देऊन देशी गोवंशाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली आहे. यानिमित्त देशभरात सर्वत्र तहसीदारांना निवेदनाची प्रत देण्यात आली. भारतात देशी गोवंशाला विधीवत सेवा, संरक्षण व ‘राष्ट्रीय सन्मान’ देण्याची मागणी या निवेदनात केली आहे. गोपालनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी केली. हे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
भारतीय संस्कृतीत गोमातेचे विशेष स्थान असून, ती आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानली जाते. गोवंश सुरक्षित नसेल तर सांस्कृतिक परंपरा अपूर्ण राहील, असे मत या वेळी जगदीशानंद महाराजांनी व्यक्त केले. देशाच्या सांस्कृतिक पुनरूत्थानाच्यादृष्टीने गोमातेला राष्ट्रीय सन्मान देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अभियानामार्फत देशभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून सरकारवर सकारात्मक दबाव निर्माण करण्याचे आवाहन होते. त्यामुळे शेकडो लोकांनी या पदयात्रेत सहभाग घेतला. या प्रसंगी गोसेवक श्रद्धा तेंडुलकर, दीपक जोशी, संजय जोशी, राजू तोडकर, चंद्रकांत राऊळ, सुशील कदम, आदिती भाटकर, प्रमोद कुलकर्णी, दिगंबर शिंदे, महेश खैर, मंगेश आरेकर, संग्राम आरेकर, बाबू पवार, जीवन जाधव व अविनाश पाटील उपस्थित होते.

कोट
सध्या भारतात देशी गोहत्येचे प्रमाण वाढले आहे. गोमांस निर्यात केले जाते. हा गोहत्येचा कलंक पुसला गेला पाहिजे. देशी गायींचे संरक्षण होणे ही काळाची गरज आहे. गायींच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे तसेच यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हावे याकरिता देशभरात सर्व तालुक्यात ही पदयात्रा काढण्यात आली.
- गणेश गायकवाड, गोसेवक, कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com