

39982
गोसंवर्धनासाठी एकसंध, कठोर कायदे करा
‘गो सन्मान’तर्फे मागणी; मालवणात तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : देशातील गोवंशाला ‘राष्ट्रमाता/राष्ट्रीय वारसा’ असा संवैधानिक दर्जा द्यावा. तसेच ‘केंद्रीय गोसेवा मंत्रालय’ स्थापन करून गोसंवर्धनासाठी एकसंध व कठोर कायदे करावेत, अशी मागणी गो सन्मान आह्वान अभियानतर्फे शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गोवंश हा भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी व्यवस्थेचा कणा आहे. सध्या तस्करी, अपघात व अवैध कत्तलीमुळे त्यांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यात गोवंश तस्करी व कत्तल यांना संज्ञेय व गैर-जामिनपात्र गुन्हा घोषित करणे. गोवंशाला ‘कायदेशीर व्यक्ती’ म्हणून मान्यता देणे. प्रत्येक जिल्ह्यात आदर्श गोशाळा व ‘नंदीशाळा’ स्थापन करणे. राष्ट्रीय महामार्गांवर गोवंशासाठी रुग्णवाहिका व उपचार केंद्रे उभारणे. शालेय शिक्षणात ‘गो-विज्ञान’ विषयाचा समावेश करणे. चारा संरक्षण व गोचर भूमी संवर्धनासाठी स्वतंत्र कायदा करणे.
निवेदनात ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना गोआधारित नैसर्गिक शेतीशिवाय अपूर्ण असल्याचे नमूद करून गोआधारित शेतीला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. हे निवेदन गोसन्मान आह्वान अभियान, मालवणचे प्रभारी भालचंद्र राऊत यांनी तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आज सादर करण्यात केले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, बजरंग दलाचे गणेश चव्हाण, विलास हडकर, बबलू राऊत, राजू आंबेरकर, नगरसेवक ललित चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, अंजना सामंत, अनिकेत फाटक, उल्हास तेंडोलकर, तेजस चव्हाण, स्वप्नील घाडी, प्रशांत हळदणकर, अनिल खडसे, अवी सामंत, रत्नाकर कोळंबकर, ॲड. पलाश चव्हाण, काशिनाथ चव्हाण, प्रशांत हिंदळेकर, महेश कदम आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.