

40016
रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान
प्रियांका नाईक ः बांद्यात शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजात मानवतेची भावना जपणारे असे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.
श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री दत्त मंदिरात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ४० हून अधिक जणांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
शिबिराचे उद्घाटन तोरसे (पेडणे) गावच्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या प्रार्थना मोटे, उद्योजक प्रभाकर मोटे, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, तोरसेचे जिल्हा परिषद सदस्य रमेश सावळ, दत्तप्रसाद कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुशांत पांगम, उपाध्यक्ष रामचंद्र ऊर्फ भाऊ वाळके, बांबोळी रक्तपेढीचे डॉ. पास्कल तसेच सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.
उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो, असे सांगितले. तरुणांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा, महिलांनीही निर्भयपणे सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश केसरकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे नीलेश मोरजकर, अक्षय मयेकर, राजेश विरनोडकर, दर्पण आळवे, शुभम साळगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांची नोंदणी, मार्गदर्शन, व्यवस्था आणि नियोजन यासाठी स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. या शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला. श्री. पिळणकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. वाळके यांनी आभार मानले..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.