जलवाहिन्यांसाठी खोदलेले चर धोकादायक

जलवाहिन्यांसाठी खोदलेले चर धोकादायक
Published on

-rat२७p१७.jpg-
26O39962
राजापूर ः जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यावर पडलेले चर धोकादायक ठरत आहेत.
----
जलवाहिन्यांसाठी खोदलेले चर धोकादायक
राजापूर ः राजापूर शहरात सुरू असलेल्या जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी शहरातील विविध भागांतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. हे खोदलेले अनेक रस्ते अद्याप तसेच असून काही ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध खोल चर राहिले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. शहरामध्ये पाणीपुरवठा वितरणाची नवी जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. सातत्याने वाहनांची वर्दळ असलेले हे रस्ते त्या ठिकाणचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ बुजवणे अपेक्षित असताना खोदलेले अनेक रस्ते तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध खोल चर राहिलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com