गझल गायन स्पर्धेची विजेती ठरली गौतमी वाडकर

गझल गायन स्पर्धेची विजेती ठरली गौतमी वाडकर
Published on

rat27p20.jpg
39973
रत्नागिरी : आर्ट सर्कल फाउंडेशन आयोजित (कै.) नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धेतील द्वितीय विजेती लीना खामकर पहिल्या छायाचित्रात व दुसऱ्या छायाचित्रात प्रथम विजेती गौतमी वाडकर हिला बक्षीस देताना राजाभाऊ शेंबेकर, संगीतकार दत्तप्रसाद रानडे.
------------
गझल गायनमध्ये गौतमी वाडकर प्रथम
‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजन; ‘शाम-ए-गझल’ने रसिक मंत्रमुग्ध
रत्नागिरी, ता. २८: आर्ट सर्कल फाउंडेशन आयोजित (कै.) नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गझल गायन स्पर्धेची सहाव्या पर्वाची विजेती ठरली पुण्याची गौतमी वाडकर. द्वितीय क्रमांक रत्नागिरीच्या लीना खामकर हिला व तृतीय क्रमांक कणकवलीच्या प्रतीक्षा कोयंडे हिने पटकावला. या विजेत्यांना स्वराधीराज राजाभाऊ शेंबेकर आणि मुख्य परीक्षक, सुप्रसिद्ध गझल गायक व संगीतकार दत्तप्रसाद रानडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात रविवारी स्पर्धा झाली. प्रथम क्रमांकाला १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये, पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात गझल गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि सुप्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे यांची सुश्राव्य मैफल अनुभवायला मिळाली.
शब्दांची नजाकत आणि स्वरांचा लहेजा यांचा सुरेख संगम असलेल्या ‘शाम-ए-गझल’ या कार्यक्रमाने रत्नागिरीकरांची मने जिंकली. दुसऱ्या सत्रात गझल गायक व संगीतकार दत्तप्रसाद रानडे यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ''चुपके चुपके'', ''काश ऐसा कोई मंजर होता'' आणि ''एक होकार दे'' यांसारख्या प्रसिद्ध गझला सादर करत त्यांनी मैफलीत रंग भरला. स्पर्धेला निखिल रानडे व प्रथमेश शहाणे (तबला) आणि चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. दत्तप्रसाद रानडे यांच्या मैफलीत हेरंब जोगळेकर (तबला) आणि उदय गोखले (व्हायोलिन) यांच्या वादनाने प्रेक्षकांची दाद मिळवली. नितीन कानविंदे यांनी आभार मानले.

कोट
गझल सादर करताना आपण कविताच सादर करत आहोत, ही भावना महत्त्वाची आहे. सतत हरकती घेऊन गाणे म्हणजे गझल नव्हे तर शब्दांच्या आशयावर आणि उच्चारांवर भर दिला पाहिजे.
- दत्तप्रसाद रानडे, गझल गायक, संगीतकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com