वजराट गावामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

वजराट गावामध्ये विविध
विकासकामांचे भूमिपूजन
Published on

40158

विविध विकासकामांचे
वजराट येथे भूमिपूजन 

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ : वजराट गावात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांची  भूमिपूजने श्री. दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
ग्रामपंचायत वजराट मधील इलेक्ट्रिक २० पोलचे कन्वर्जन करण्यासाठी ५ लाख रुपये निधी, वजराट परबवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी १७ लाख रुपये निधी, वजराट चव्हाटा मंदिर ते पलतड परबवाडी येथे रस्ता मजबुतीकरण करणे ५ लाख, पिंपळगाव उदवगिरीवाडी येथे रस्ता मजबुतीकरण करणे ५ लाख, वेंगुर्ला पंचायत समिती सेस फंडातून पिंपळगाव शाळा दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये इत्यादी विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांचा शुभारंभ मनीष दळवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, भाजपा तालुका चिटणीस नितीन चव्हाण, प्रमुख गावकर सुर्यकांत पुंडलिक परब, वजराट श्री गिरेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव ऊर्फ ताता परब, वजराट सोसायटी व्हाईस चेअरमन दत्तात्रय उर्फ अण्णा वजराटकर, माजी सरपंच महेश राणे, माजी उपसरपंच नितीन परब, वामन भोसले, प्रवीण कांदे, वसंत परब, माजी सरपंच रमेश राणे, महेश राणे, राजन परब, सोसायटी संचालक सत्यवान सावंत, निवृत्ती घोणे, मंगेश परब, संदीप पेडणेकर, रविंद्र पालयेकर, निवृत्ती घोणे, मेघश्याम परब, मंगेश परब, शेखर परब, मकरंद गोंधळेकर, संजय केरकर, विजयसिंग परब, जयसिंग देसाई, सत्यवान सावंत आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com