मंडणगड - उत्पन्नाचा शाश्वत मार्ग

मंडणगड - उत्पन्नाचा शाश्वत मार्ग
Published on

Rat28p9.jpg
40154
मंडणगड: तालुक्यात फळबाग लागवडीचा विस्तार होत असून, पाले येथील शेतकरी सहदेव माळी यांनी केलेली काजू लागवड क्षेत्रास भेटी दरम्यान अधिकारी वर्ग.

मंडणगड तालुक्यात १२९ हेक्टरवर फळबाग लागवड
६५ गावातील २०१ शेतकरी सहभागी; उत्पन्नाचा शाश्वत मार्ग

एक नजर
* मध्यम ते उच्च शेतकरी सहभाग
* आंबा-काजूवर आधारित नियोजन
* बहुपिक पद्धतीचा अवलंब
* स्थानिक रोजगारनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ ः तालुक्यात कृषी विभागाच्या पुढाकारातून फळबाग लागवड या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, एकूण २०१ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. तालुक्यातील ६५ गावांतील एकूण १२९.९२ हेक्टर क्षेत्रावर २५ हजार ८५० रोपांची लागवड केली आहे.
फळबाग लागवड उपक्रमांतर्गत आंबा रोपं ५०.१४ हेक्टरवर, काजू रोपं ६४.०१ हेक्टरवर, नारळ ९.१२ हेक्टरवर, बांबू ४.६५ हेक्टरवर तर इतर पिके २.०० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहेत. या योजनेसाठी एकूण ६४ लाख ६९ हजार ८० रुपयांचा खर्च झाला असून, त्यात अकुशल मजुरीसाठी ४६ लाख ५६ हजार ६०० रुपये तर कुशल मजुरीसाठी १८ लाख १२ हजार ४८० रुपये खर्च केले आहेत. या योजनेची अंमलबजावणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच ठिबक सिंचनाबाबत उदासीनता, निधी वितरणातील विलंब आणि उताऱ्यातील सामायिक क्षेत्रामुळे संमती मिळवण्यात येणाऱ्या अडचणी या समस्या आहेत. तरीही मंडणगड तालुक्यात या योजनेला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

कोट
फळबाग लागवड ही शाश्वत उत्पन्नाचा स्रोत ठरू शकते तसेच प्रक्रिया उद्योग आणि बहुपिक पद्धतीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील शेती अधिक सक्षम आणि टिकाऊ होण्यास मदत होईल.
- सोमनाथ अहिरकर,
तालुका कृषी अधिकारी. संपर्क ७७०९५५८५०४

चौकट
दृष्टिक्षेपात तालुका
* सहभागी गावे ः ६५
* एकूण लाभार्थी शेतकरी : २०१
* लागवड क्षेत्र : १२९.९२ हेक्टर
* एकूण रोपे : २५,८५०
* एकूण खर्च : ६४.६९ लाख
* अकुशल मजुरी : ४६.५६ लाख
* कुशल मजुरी : १८.१२ लाख

-------
चौकट
योजनेतील अडथळे

पावसावर अवलंबित्व
ठिबक सिंचनाबाबत उदासीनता
निधी विलंब
सामायिक जमिनीवरील वाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com