रत्नागिरी जिल्ह्याचा आदर्श राज्यात निर्माण करु

रत्नागिरी जिल्ह्याचा आदर्श राज्यात निर्माण करु
Published on

- rat२८p१५.jpg-
26O40183
जिल्हाधिकारी मनुज जिंदल मार्गदर्शन करताना.

रत्नागिरीचा आदर्श राज्यात निर्माण करू
मनुज जिंदल ः सामान्यांना घरपोच अन् डिजिटल सुविधा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ः सामान्यांची सर्वांनी दखल घेऊन कमीत कमी कागदपत्रात त्याला कशी सुविधा देता येईल यासाठी सर्वांनी काम करावे. येत्या वर्षभरात घरपोच सुविधा, डिजिटल सुविधा देऊन राज्यात आपण आदर्श निर्माण करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
सेवा हक्क दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सेवा वितरण प्रक्रियेत मी कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेन...,’ अशी शपथ आज अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जिल्हाधिकारी जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्यासह विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी उपस्थितांना शपथ दिली. या प्रसंगी जिंदल म्हणाले, जिल्ह्यातील काही विभागांची कामगिरी कमी आहे. देशाला विकसित, समृद्ध बनवायचे असेल तर सर्वसामान्य जनतेला सहज, सुलभ घरबसल्या सेवा कमीत कमी वेळेत, कमी कागदपत्रात उपलब्ध करून द्यायला हवी. त्यासाठी मानसिकता बदलावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी गलांडे यांनी प्रास्ताविक केले. चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या वेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
---
सुमार कामगिरी करणाऱ्यांना दंड
सर्व विभागांची कामगिरी ९८ टक्क्यांपेक्षा पुढे हवी. सुमार कामगिरी करणाऱ्या विभागासाठी पाच हजार दंडाची तरतूद आहे, हेही लक्षात ठेवावे. सेतू केंद्रामधून संवेदनशीलता हवी. जनतेला ताटकळत, उभे राहायला लागू नये. त्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना दिल्या.
---
नागरिकांना पारदर्शी सेवा द्या
सेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा देताना राज्यात प्रथम येण्याचे आव्हान सर्वच विभागांनी स्वीकारावे. विहित कालावधीत ९८ टक्क्यांपेक्षा जास्त निर्गती व्हायला हवी. विहित कालावधीत पारदर्शी सेवा नागरिकांना देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहू, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com