

बनावट नोटांचे ‘सांगली कनेक्शन’
सावंतवाडीतील प्रकार ः सहा जण अटकेत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ : शहरातील एका बँकेमध्ये भरलेल्या पैशांत २०० रुपयांच्या ८ बनावट नोटा आढळल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात या बनावट नोटांचे ‘सांगली कनेक्शन’ उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी सहा संशयितांना अटक केली. सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२), राहुल राजाराम जाधव (३३), इब्रार आदम इनामदार (४४), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०), सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, रा. मालाड मुंबई) आणि संदीप बाळू कांबळे (३८) यांचा समावेश आहे. म्हात्रे मुंबईचा रहिवासी असून, इतर संशयित कोल्हापूरचे आहेत. संशयितांना काल सावंतवाडीतील गुन्ह्यामध्ये अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे आढळलेल्या बनावट नोटांच्या सीरियल नंबरची सीरिज आणि सांगली शहरातील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील जप्त नोटांची सीरिज एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावरून दोन्ही गुन्ह्यांतील संशयितांचे धागेदोरे जोडले गेले. या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलिसांनी सांगली न्यायालयाच्या आदेशाने सांगली कारागृहातून वरील सहा संशयितांना ताब्यात घेतले. न्यायालयाने संशयितांना आज दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.