देवरूखचा अग्निदूत जनतेसाठी देवदूत

देवरूखचा अग्निदूत जनतेसाठी देवदूत
Published on

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन---लोगो
-rat४p११.jpg -
26O41266
देवरूख ः देवरूख नगरपंचायतीची अग्निशमन गाडी.
-----
देवरूखचा ‘अग्निदूत’ जनतेसाठी देवदूत
पाच मोठ्या आगींवर यशस्वी नियंत्रण; ग्रामीण भागासाठी आधार
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ४ ः ‘आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन’ आज साजरा होत असताना, देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. चालू वर्षात या दलाने तब्बल पाच मोठ्या आगींवर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळवून मोठी जीवित व वित्तहानी टाळली आहे. केवळ शहरच नव्हे, तर संपूर्ण संगमेश्वर तालुक्यासाठी हे दल आता खऱ्या अर्थाने ‘आधार’ वाटू लागले आहे.
गेल्या महिन्यात साखरपा येथे एका खासगी आराम बसला भीषण आग लागली होती. आगीचे स्वरूप अत्यंत रौद्र होते; मात्र देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाने आणि जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या कामगिरीमुळे आगीचा अधिक प्रसार टळला. देवरूखकडे स्वतःची अग्निशमन यंत्रणा असल्याने संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी आगीच्या घटनेसाठी रत्नागिरी किंवा चिपळूणच्या बंबाची वाट पाहावी लागायची; मात्र आता देवरूख नगरपंचायतीमुळे ही मदत वेळेत उपलब्ध होत आहे. आजच्या अग्निशमन दिनानिमित्त या देवदूतांच्या कार्याला सर्वच स्तरांतून सलाम केला जात आहे.
-----
कोट
देवरूख नगरपंचायतीचे अग्निशमन दल हे केवळ शहरापुरते मर्यादित न राहता तालुक्याच्या सेवेसाठी नेहमीच सज्ज असते. आमच्या जवानांचे धाडस आणि अद्ययावत अग्निशमन बंब यांच्या जोरावर आम्ही यंदा पाच महत्त्वाच्या घटनांमध्ये हानी रोखू शकलो. नागरिकांच्या मालमत्तेचे आणि प्राणांचे रक्षण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. भविष्यातही हे दल अधिक सक्षम करण्यावर आमचा भर राहील.
​-- प्रशांत भोसले, मुख्याधिकारी, देवरूख नगरपंचायत

दृष्टिक्षेपात
* आपत्कालीन काळात यंत्रणेची तातडीने धाव
* नगरपंचायत क्षेत्रासोबतच ग्रामीण भागातील दुर्घटनांनाही प्राधान्याने प्रतिसाद
​* एकूण पाच मोठ्या आगींवर यशस्वी नियंत्रण
* कर्मचारी सहा
---
यावर संपर्क करा
अगीसारखी घटना घडल्यास नागरिकांनी त्वरीत ०२३५४-२६०१४६, २६०१५७ आणि टोल फ्री क्रमांक १८००२३३०१५७ यावर संपर्क करावा असे आवाहन अग्निशामक दलाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com