

-rat4p18.jpg-
26O41291
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना ॲड. विजय साखळकर. डावीकडून ॲड. विलास पाटणे, डॉ. मुकुंद जोशी, शिल्पा पटवर्धन आणि शिल्पा सुर्वे आदी.
-------
रत्नागिरी एज्युकेशनच्या
‘फूड लॅब’साठी एक कोटी
मंत्री उदय सामंत ः ‘अभ्यंकर-कुळकर्णी’चा सुवर्ण महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या फूडटेस्टिंग लॅबसाठी पुढच्या दोन महिन्यांत एक कोटी रुपये देऊ, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली. संस्थेच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
खातू नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई यांनी संस्था आता नवीन प्रयोगशाळा चालू करत आहे. यामध्ये अल्पदरामध्ये शेतकरी आंबा बागायतदारांना व व्यावसायिकांना खाद्यपदार्थ चाचणी करण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी सामंत यांनी एक कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून लगेचच मंत्री सामंत यांनी निधीची ग्वाही दिली.
कार्यक्रमात मंचावर नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, ॲड. विलास पाटणे, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, देणगीदार प्रतिनिधी आनंद अभ्यंकर आणि निरंजन कुळकर्णी, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक आणि नियामक मंडळ सदस्य मनोज पाटणकर, डॉ. चंद्रशेखर केळकर, भरत ओसवाल, राजन मलुष्टे, प्राची जोशी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप व माजी विद्यार्थी प्रतिनिधी बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ॲड. पाटणे यांनी निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करण्याची मागणी पालकमंत्री सामंत यांच्याकडे केली. डॉ. मुकुंद जोशी यांनी मनोगतामध्ये बाबुराव जोशी यांच्या आठवणी सांगितल्या.
शिवछत्रपती पुरस्कार विजेती माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या सावंत, नगराध्यक्ष सुर्वे, प्रमुख देणगीदार कुळकर्णी आणि अभ्यंकर यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.