

rat६p७.jpg-
26O41761
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात तालमिलाप कार्यक्रमातील एका नृत्यातील क्षण.
‘तालमिलाप’ने जिंकली रसिकांची मने
‘अभ्यंकर’ महाविद्यालयात आयोजन; सहभागींचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना संस्थापक बाबूराव जोशी व मालतीबाई जोशी यांनी केली. संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत तालमिलाप या कार्यक्रमातून गायन, वादन आणि नृत्य यांचा सुंदर संगम साधत जोशी दाम्पत्याला आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभाचे.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या कार्यक्रमात गायन विभागात ऊर्जा आपटे, सार्था गवाणकर, आदिती सावंत, वृंदा दळवी आणि पृथ्वीराज जोशी यांनी सुरेल गाणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. नृत्य विभागात पूर्वा हातफळे, गौरी सावंत, प्रार्थना भंडारे, श्वेता गावडे, आस्था खेडकर आणि गायत्री ठीक यांनी विविध नृत्यशैलींचा अप्रतिम आविष्कार सादर केला.
वाद्यवृंदात हर्ष बोंडाळे, पारितोष काळे, साहिल पेंढारी, अजिंक्य शिंदे, जाई जोशी, स्वरूप नेने, चिन्मय साठे, अभिषेक धुळप, पार्थ देवळेकर, गंधार दामले, अवधूत जोशी आणि आर्यन निकम यांनी तालबद्ध साथ देत कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. मैथिली सावंत, तन्मय डांगे, शुभम रहाटे, तनिष्का शिरधनकर, गंधाली मुळ्ये आणि जान्हवी पालकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वेदांग सौंदळगेकर, डॉ. आनंद आंबेकर आणि हरेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम सादर केला. या सर्वांचा सत्कार कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.