कुडाळात उद्या महसूल शिबिर

कुडाळात उद्या
महसूल शिबिर
Published on

कुडाळात उद्या
महसूल शिबिर
तहसीलदार पाटील : लाभ घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ : नगरपंचायत व महसुली मंडल स्तरावर शुक्रवरी (ता. ८) सकाळी १० वाजता येथील तहसीलदार कार्यालयात महसूल शिबिराचे आयोजन केल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी महसूल विभागातील महत्त्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी देण्यासाठी येथील तहसील कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर होणार आहे. यामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, ‘सनद’ प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे (संजय गांधी योजना) लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायदा उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप व ई- मोजणी अर्ज, शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग-२ चे वर्ग-१ करण्याबाबतची प्रकरणे, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्डवरील नाव कमी-जास्त करणे, तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गावदप्तर अद्ययावत करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यासह संबंधित सेवाविषयक अर्जही स्वीकारण्यात येणार आहेत. तालुक्यातील ग्रामस्थांनी या दिवशी आयोजित केलेल्या शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com