

swt613.jpg
41801
सावंतवाडी : संतोष तळवणेकर यांना भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
भाजप सरचिटणीसपदी संतोष तळवणेकर
सावंतवाडी : भाजपच्या सावंतवाडी सरचिटणीसपदी येथील संतोष तळवणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते श्री. तळवणेकर यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संतोष तळवणेकर यांनी आजवर संघटनात्मक कार्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या याच सक्रियतेची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. सर्वांच्या उपस्थितीत नवनियुक्त सरचिटणीस संतोष तळवणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी ही त्यांची नियुक्ती होते जाहीर केली. यावेळी नगरसेवक प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक सुनीता पेडणे, सुकज्ञा टोपले, सिध्दांत भांबूरे, साक्षी गवस, राघु चितारी, मेघना साळगांवकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.