

दापोली शहरात सीएनजीचा तुटवडा
पंपावर लांबलचक रांगा ; वाहनचालक, प्रवाशांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. ६ : कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या दापोली शहरात सध्या सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या सीएनजी वाहनांच्या संख्येच्या तुलनेत अपुरा पुरवठा असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
दापोली परिसरात केवळ दोनच सीएनजी पंप असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेकवेळा तासनतास प्रतीक्षा करूनही गॅस मिळत नसल्याने रिक्षाचालक, खासगी वाहनधारक व मालवाहतूक करणाऱ्यांना फटका बसत आहे. या टंचाईमुळे काही वाहनचालक पुन्हा पेट्रोल-डिझेलकडे वळले असून, त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. काहींनी व्यावसायिक कामकाजही मर्यादित केले आहेत. याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर अतिरिक्त सीएनजी पंप सुरू करून पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
----
पर्यटनावर परिणाम
उन्हाळी सुटी सुरू झाली आहे. पर्यटकांची कोकणाला पसंती असते. पण सध्या दापोली परिसरात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पर्यटकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्याचा परिणाम पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.