

- rat6p15.jpg-
26O41812
हस्ताक्षर स्पर्धेत यशस्वी झालेले पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक.
हस्ताक्षरमध्ये अभिज्ञा, कस्तुरी, सृष्टी प्रथम
कोकणकट्टाचे आयोजन; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ६ ः येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. यात अ, ब आणि अकरावी-बारावी गटात अभिज्ञा पवार, कस्तुरी घाणेकर व सृष्टी पालशेतकर या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावला.
कोकणकट्टातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत ‘अ’ गटात अभिज्ञा पवार, स्वरा गावडे, रूची तुप्ते यांनी तर शौर्य जोशी व युगा किर्वे यांनी यश मिळवले. ‘ब’ गटात कस्तुरी घाणेकर, गायत्री भिडे, ओजस्वी वासनिक यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला तर शमिका धामणस्कर, अथर्व घाणेकर यांना उत्तेजनार्थ म्हणून गौरवण्यात आले. अकरावी ते बारावी गटात सृष्टी पालशेतकर, रूपेश माटल, अनुष्का धनावडे यांनी तर अमृता घरवे, आर्या ठोंबरे यांना उत्तेजनार्थसाठी निवडण्यात आले. या स्पर्धेत सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे आयोजक कोकणकट्टाचे संस्थापक अजित पितळे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातर्फे मुख्याध्यापिका चव्हाण यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी पाटपन्हाळे विद्यालयातील शिक्षक भिडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. गुहागर तालुक्यातील पालपेणे हायस्कूल, मुंढर हायस्कूल, नातू प्रतिष्ठानचे पाचेरीआगर विद्यालय या विद्यालयांमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेतील सुशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनी आयोजकांतर्फे बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.