

- rat६p१.jpg -
26O41737
चिपळूण येथील बसस्थानकावर आलेले प्रवासी ग्रामीण भागात जाण्यासाठी ताटकळत उभे असतात.
उन्हाळी सुटीत एसटीची कमतरता
चिपळूणमधील स्थिती ; नियोजनाचा आभाव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : उन्हाळी सुटीमुळे चिपळूणमध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे; मात्र, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने वाढत्या गर्दीचे नियोजन केलेले नाही. यंदा जादा बसेसची व्यवस्था केलेली नसल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकवेळा ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना एसटी बससाठी ताटकळत राहावे लागत आहे.
चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि शिवाजीनगर बसस्थानकांवर सुटयांमुळे प्रवाशांची मोठी झुंबड उडत आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सोलापूरहून चाकरमानी चिपळूणमध्ये येत आहेत. त्यांना बसस्थानकातून गावी जाण्यासाठी स्थानिक एसटीची गरज असते; परंतु प्रवाशांची वाढलेली संख्या आणि गाड्यांचा पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे गैरसोय होत असून, नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अडरे, अनारी, वेहळे तसेच दसपटी भागात जाण्यासाठी एसटीच्या कमी फेऱ्या आहेत. खेड तालुक्याच्या पंधरागाव भागात जाण्यासाठी प्रवाशांना एसटीवर अवलंबून राहावे लागते. चिपळूण ते गुहागर या मार्गावरील गावात जाण्यासाठी सुद्धा प्रवाशांसाठी एसटी हाच पर्याय आहे.
---
प्रवाशांचे हाल...
कोकणात उन्हाळी सुटीसाठी मोठ्या प्रमाणावर मुंबई-पुण्यातून चाकरमानी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर पर्यटकांचीही मोठी गर्दी आहे. एसटी बसेसच्या कमतरतेमुळे जादा फेऱ्याचे नियोजन ढासळले आहे. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.
...
कोट १
आगारातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता एक ते दोन तासानंतर गाडी येईल, असे सांगितले जाते. वेळाने गाडी फलाटावर आल्यामुळे प्रवाशांची झुंबड उडते. या जीवघेण्या गर्दीत महिला आणि वयोवृद्धांनी एसटीत चढायचे कसे? असा प्रश्नच आहे.
- सुवर्णा कदम, प्रवासी, मुसाड ता. खेड.
..........
कोट
गावी जाण्यासाठी लहान मुलांना घेऊन दोन तासांपासून बसची वाट पाहत उभा आहे. एसटी प्रशासनाला उन्हाळी सुट्यांमधील गर्दीचा अंदाज आधीच यायला हवा होता. प्रवाशांची संख्या वाढत असताना मोजक्याच गाड्या सोडणे म्हणजे सहनशीलतेचा अंत पाहण्यासारखे आहे.
- प्रमोद शिंदे, प्रवासी, खडपोली, ता. चिपळूण
---
कोट
प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून गाड्यांचे नियोजन केले जात आहे. उपलब्ध सर्व एसटी गाड्या अधिकाधिक प्रवासी सेवेत धावतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गर्दीच्या मार्गावर जास्त गाड्या सोडण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्यांची संख्या मर्यादित आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.
- दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.