कासार्डे कॉलेजचा निकाल ९७.३६ टक्के

कासार्डे कॉलेजचा निकाल ९७.३६ टक्के
Published on

swt629.jpg
41836
तन्वी साईम
swt630.jpg
41837
आर्यन लाड
swt631.jpg
41866
आरती भाट

कासार्डे कॉलेजचा निकाल ९७.३६ टक्के
बारावी परीक्षा : तन्वी साईम, आर्यन लाड, आरती भाट प्रथम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ६ : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेत कासार्डे ज्युनियर कॉलेजचा एकत्रित निकाल ९७.३६ टक्के लागला. तिनही शाखांचे मिळून एकूण २२८ विद्यार्थ्यांपैकी २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेमधून तन्वी साईम, वाणिज्य शाखेमधून आर्यन लाड तर विज्ञान शाखेमधून आरती भाट यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या कनिष्ठ महाविद्यालयाचा शाखा निहाय निकाल असा : कला शाखेतून २५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले असून त्यापैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात अनुक्रमे तन्वी दीपक साईम प्रथम (५८.८३), द्वितीय तुषार अनय पाटोळे (५२.८३), तर तृतीय पूजा बालकृष्ण आयरे (५०.८३). वाणिज्य शाखेतून ११८ पैकी ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आर्यन विलास लाड (८८.३३) प्रथम, रश्मी संतोष वडजु (८३.३३) द्वितीय तर रोहिणी नामदेव सोमले (८३.१७) तृतीय. विज्ञान शाखेतून ८५ पैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम - आरती विजय भाट (६३.५०), द्वितीय - आर्यन गणेश गिरकर (६०.००) तर तृतीय हर्ष सुरेश मांजरेकर (५९.१७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com