जिल्हा दक्षता समितीची सिंधुदुर्गनगरी येथे बैठक

जिल्हा दक्षता समितीची सिंधुदुर्गनगरी येथे बैठक
Published on

दक्षता समितीची सिंधुदुर्गनगरी येथे बैठक
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, पोलिस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व सद्यस्थिती, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई आदींचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे प्रतिनिधी प्रवीण कोल्हे, पोलिस निरीक्षक ज्योती चव्हाण, सहायक संचालक, सरकारी अभियोक्ता, (प्रतिनिधी) शिल्पा गोबडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिशांत कोळप, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे उपस्थित होते. यावेळी सामाजिक न्याय व‍ विशेष सहाय्य विभागामार्फत २०२४-२५ व २०२५-२६ करिता (व्यक्ती व संस्था) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, साहित्य रत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार व शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार आदी एकूण १० प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस घेण्यात आली. हे पुरस्कार शासनास सादर करण्यात येणार आहेत.
....................
तीर्थदर्शन यात्रेसाठी २२ पर्यंत अर्ज द्या
सिंधुदुर्गनगरी ः राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्याचे घोषित केले आहे. भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्याकडे २२ मे पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. ७५ वर्षांवरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी (ज्यांचे वय ६० पेक्षा कमी असेल) किंवा सहायक (ज्यांचे वय २१ ते ५० वर्षे असेल) यापैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल.
...................
''एकदा द्रवनत्र''साठी १८ पर्यंत दरपत्रक द्या
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना महिन्यातून एकदा द्रवनत्र रेतमात्रा आदींचा पुरवठा वाहतूक करण्यासाठी एक वर्षाचा भाऊबंद करार करण्यात येणार असून खासगी वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांनी दरपत्रके १८ मे पर्यंत मोहोर बंद लिफाफ्यात सादर करावी, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपआयुक्त डॉ. समीर बिलोलीकर यांनी केले आहे. हा करार दिनांक १ जून २०२६ ते ३१ मे २०२७ या कालावधीसाठी आहे. दरपत्रके १९ मे रोजी सकाळी ११ वाजता उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग येथे नियुक्त समितीसमोर उघडण्यात येणार आहेत. वाहतुकीचा कमीत कमी दर नमूद केलेल्या पुरवठादारास पुरवठा आदेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com