

स्थायी समितीची सभा ११ मे रोजी
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सर्वसाधारण सभेच्या तारखे मध्ये बदल करण्यात आलेला आहे .ही सभा ६ मेऐवजी ११ मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) तथा स्थायी समिती सचिव जयप्रकाश परब यांनी कळविले आहे.
-------
एमएचटी-सीईटी, २०२६
द्वितीय सामायिक परीक्षा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ : एमएचटी-सीईटी २०२६ द्वितीय सामायिक परीक्षा एमबीए/ एमएमएस /पीसीबी/पीसीएम गट परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन , मालवण, वायरी मालवण या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी कळविले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र ,बी प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने एमएचटी-सीईटी २०२६ द्वितीय सामायिक परीक्षा एमबीए एमएमएस गट ९ मे रोजी, पीसीबी गट १० व ११ मे रोजी व पीसीएम गट १२ ते १५ मे व १९ व २० मे या कालावधीत सकाळी ७.३० सायंकाळी ६.४५ या वेळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन वायरी मालवण या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.