लोटे, खडपोली एमआयडीसीतील अतिक्रमणे रडारवर

लोटे, खडपोली एमआयडीसीतील अतिक्रमणे रडारवर
Published on

‘लोटे, खडपोली’तील अतिक्रमणे रडारवर
अनेकांनी डावलले आदेश; लवकरच कारवाईची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः खेर्डी एमआयडीसीतील वर्षानुवर्षे असलेली बेकायदा अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात काढण्यात आली. यानंतर एमआयडीसी प्रशासनाकडून लोटे तसेच खडपोली एमआयडीसीतील बेकायदा अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रामुख्याने लोटे एमआयडीसीत वर्षानुवर्षे थाटलेली मोठी बांधकामे एमआयडीसीच्या रडारवर आली आहेत.
काही महिन्यांपूर्वी लोटे एमआयडीसीतील एका कारखान्यात साहित्यपुरवठा करणाऱ्या मालवाहू ट्रकने कंपनीसमोरील रस्त्याच्या बाजूस असलेल्या टपरीधारकाच्या पत्र्याच्या शेडला धक्का दिला होता. यामध्ये टपरीच्या शेडचे नुकसान झाल्याने संबंधित टपरीचालक व तेथील जमावाने संबंधित ट्रकचालकास बेदम मारहाण केली होती. यानंतर संबंधित कंपनी व्यवस्थापनाने सदरची बाब राजकीय पुढाऱ्यांच्या कानावर घातली. त्यानंतर काही दिवसातच एमआयडीसीत बेकायदा तळ ठोकलेल्या व्यावसायिकांना धक्का देण्याचे ठरवले. जिल्ह्यातील सर्वच एमआयडीसीतील बेकायदा बांधकाम धारकांना त्वरित बांधकाम काढण्याचे आदेश दिले होते; मात्र यानंतरही बहुतांशी व्यावसायिकांनी बांधकामे काढली नाहीत. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी खेर्डी एमआयडीसीतील तीन अनधिकृत बांधकामांवर पोलिस बंदोबस्तात जेसीबी चालवण्यात आला. यातील पेपर मिलसमोरील एक हॉटेल गेली २० ते २५ वर्षाहून सुरू होते. त्यांनी अनधिकृत बांधकामाचा विस्तारही वाढवला होता. खेर्डी औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीचे विभागीय कार्यालय असतानाही येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नव्हती; मात्र लोटे येथील मारहाणी प्रकरणानंतर एमआयडीसीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खेर्डी येथील अनधिकृत बांधकामे पाडल्यानंतर आता लोटे एमआयडीसीतील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पुढील काही दिवसात ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com