

लांजात १३ ला जनता दरबार
लांजा ः पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार १३ मे रोजी दुपारी ३ वा. शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय येथे जनता दरबार आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रियांका ढोले यांनी दिली. गेल्या तीन-चार वर्षात तालुक्याची आमसभादेखील झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झालेले नाही म्हणूनच पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या या जनता दरबारात लोकांना आपले प्रश्न, समस्या मांडता येणार आहेत. नागरिकांनी जनता दरबारात आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन तहसीलदार प्रियंका ढोले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.