

- rat७p१४.jpg-
26O41961
साखरपा : दाभोळे येथील पुलावरून प्रवास करणारी वाहने.
दाभोळेतील नवीन पूल वाहतुकीस खुला
रत्नागिरी-नागपूर महामार्ग; प्रवाशांची प्रतीक्षा संपली
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ७ ः रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित असा दाभोळे येथील नवीन पूल अखेर वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. पुलाची एक मार्गिका सुरू झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, दाभोळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्याही सुटण्यास मदत झाली आहे.
काजळी नदीला लागून असलेल्या या पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. प्रत्यक्ष पूल आणि दोन्ही बाजूंचे उतार मिळून या पुलाची एकूण लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. दाभोळे गावातील जुन्या महामार्गावर असलेला अरुंद पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांकडून नवीन पूल तातडीने सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती.
गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरील रत्नागिरीहून येणारी एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. सध्या याच मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे दाभोळे बाजारपेठेतून जाणारा जुना रस्ता आता वाहतुकीच्या ताणातून मुक्त झाला आहे. महामार्गाच्या या नवीन पुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.