दाभोळ खाडीत पर्यटन हाऊसबोट सेवेला औपचारिक प्रारंभ

दाभोळ खाडीत पर्यटन हाऊसबोट सेवेला औपचारिक प्रारंभ
Published on

-rat७p२.jpg-
P26O41947
दापोली ः हाऊसबोटीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोटीतून सफारीसाठी जाताना राज्यमंत्री योगेश कदम व सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते.
------
दाभोळ खाडीत हाऊसबोट सेवा
महिलांना स्वावलंबनाची संधी ; उपक्रमाचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता.७ ः येथील दाभोळ खाडीतील निसर्गरम्य बॅकवॉटर आता पर्यटनाच्या नव्या पर्वाचे साक्षीदार ठरणार असून, जलपर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे. येथील बचतगटाकडून केरळच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या हाऊसबोट सेवेमुळे दाभोळ खाडी राज्याच्या पर्यटन नकाशावर नव्या आकर्षणाचे केंद्र बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि विस्तीर्ण दाभोळ खाडीत पर्यटन हाऊसबोट सेवेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. दाभोळ खाडीतील शांत, नयनरम्य बॅकवॉटर परिसराचा पर्यटनासाठी प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. केरळच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या हाऊसबोट सेवेमुळे पर्यटकांना खाडीतील निसर्गसौंदर्य, समुद्री वातावरण आणि जलपर्यटनाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरणावर देण्यात आलेला भर. सिंधुरत्न समृद्धी योजना, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचतगटांना हाऊसबोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत होणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दाभोळ धक्क्यावर या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे लोकार्पण झाले.
--------
रोजगार निर्मितीच्या संधी
या उपक्रमामुळे स्थानिक युवकांनाही पर्यटनाशी संबंधित विविध रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हाऊसबोट सेवा, पर्यटक मार्गदर्शन, खाद्यव्यवसाय आणि स्थानिक हस्तकला यांसारख्या पूरक व्यवसायांनाही या प्रकल्पामुळे गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com