

swt714.jpg
42041कुणकेरी ः येथे आयोजित कार्यक्रमात संग्राम कासले यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. आंबेडकर यांचे कार्य सर्वव्यापी
संग्राम कासले ः कुणकेरी समाज मंदिरात जयंती उत्सव
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य व्यापक आहे, म्हणून तर ते प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक व्यक्तीसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांचे सर्वव्यापी कार्य आपण जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घटकाला समजावून सांगूया, असे प्रतिपादन बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर कुणकेरी येथे केले.
भीमसेना युवक मंडळ व माता रमाबाई महिला समूह कुणकेरी यांच्यावतीने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव सोहळा समाज मंदिर, कुणकेरी येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री. कासले हे बोलत होते. याप्रसंगी सरपंच सोनिया सावंत, पोलिसपाटील तानाजी सावंत, ग्रामपंचायत सदस्य जितेश कुणकेरकर, सदस्य मानसी परब, माजी उपसरपंच शिल्पा कुणकेरकर, भीमसेना युवक मंडळाचे अध्यक्ष निशांत कुणकेरकर, संदेश कुणकेरकर, उपाध्यक्ष आकाश कुणकेकर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
श्री. कासले म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. याचबरोबर त्यांचे अनेक क्षेत्रात योगदान आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच रिझर्व बँकेची स्थापना झाली. ''नद्या जोड प्रकल्प'' ही डॉ. आंबेडकर यांची संकल्पना आहे. हिंदू कोड बिलांच्या माध्यमातून महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात आली. बाबासाहेबांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवला. म्हणून तर त्यांची ''कामगारांचे नेते'' म्हणून देशात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
कुणकेरी सरपंच सोनिया सावंत यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ शशिकांत सावंत, विठ्ठल स्वार, रामकृष्ण गावडे, महादेव सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. माजी सैनिक कैलास परब, सामाजिक कार्यकर्ते राजन मडवळ, सुनील परब उपस्थित होते. तसेच माता रमाईनगर येथील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन सायली कुणकेरकर, समीक्षा कुणकेरकर यांनी केले. प्रास्ताविक सतीश कुणकेरकर यांनी केले. अवनी कुणकेरकर यांनी आभार मानले.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.