

सुरू करा स्वतःचा घरगुती मसाला व्यवसाय
कोल्हापूर येथे १२ मे रोजी होणार विशेष कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ७ : बाजारपेठेमध्ये घरगुती मसाल्यांना वाढती मागणी आहे. धावपळीच्या जगात विविध प्रकारचे मसाले तयार करणे शक्य होत नसल्याने घरगुती व पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मसाल्यांना गृहिणी व हॉटेल उद्योगाकडून चांगली मागणी निर्माण झाली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मसाल्याचे असलेले महत्त्व, मसाला उद्योगातून होणारी मोठी उलाढाल, मसाला उद्योगाची निर्मिती या अनुषंगाने कृतीतून १५ प्रकारचे व्यावसायिक मसाले व त्यांचा व्यवसाय कसा उभारावा, याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण १२ मे रोजी कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात आयोजिले आहे. यामध्ये पारंपरिक व नावीन्यपूर्ण मसाले व्यावसायिक पद्धतीने शिकविले जाणार आहेत. कमी भांडवलामध्ये मसाले व्यवसायाची उभारणी कशी करावी याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोबतच मसाल्यांचे मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकेजिंग, लेबलिंग, विविध प्रकारचे परवाने, प्रकल्प अहवाल, मशिनरी, शासकीय अनुदान यांची माहिती दिली जाणार आहे. मसाला क्वीन म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा प्रसिद्ध अन्न प्रक्रिया प्रशिक्षक गंधाली दिंडे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
क्यू आर कोड ४२०२६
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
कार्यशाळा सशुल्क असून, अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.